जनावरां मधील कासदाह


जनावरां मधील कासदाह

दूध हे प्रत्येक पशुपालकाच्या आथिर्क उत्पन्नाचा प्रमुख साधन असते जंतुसंसर्ग यांच्यातील नातं माहिती नसल्यामुळे पशुपालकांना कासदाह आजाराचे चटके सहन करावे लागतात .

कासेत दूधनिर्मिती कशी होते ?
       कासेकडून दूधनिर्मिती घडुन येते ,कारण कासेच्या ग्रंथी रक्तातील आवश्यक घटक घेऊन त्यांचे दुधात रूपांतर करतात . ते घटक रक्तात असतात तेच घटक पुढे दुधात दिसून येतात .
        कासेत निर्माण होणारे दूध दिवसातून दोन वेळेस काढणे गरजेचे असते . वीस लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाई -म्हशींच्या दिवसातून तीन वेळेस धार काढावी लागते .

कासदाह होंण्याची कारणे ? 

 • दूध काढल्यानंतर सडाच्या उघड्या तोंडातून होणारा जंतुप्रवेश . 
 •  कासेतून अपूर्ण दूध संकलन 
 • कासेला होणाऱ्या जखमा
 • प्रसूतीनंतर गर्भाशयातून होणारा जंतुयुक्त प्रसारण
कासदाह कसा होळखावा ? 
 • जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते.
 • दूध उत्पादन कमी होते .
 • दुधाचा रंग बदलतो ,
 • पाणिमिश्रित दुधाच्या गाठी सडातून बाहेर पडतात.
 • कासेच्या ओटीपोटाकडील भाग हा गरम ,सूज आलेला असतो . 
कासदाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय 
 • दूध काढण्यापूर्वी आणि काढल्यानंतर गुरांचा कोरडा आणि स्वच्छ राहील ,याची काळजी घ्यावी . 
 •  दुधाची भांडी ,कास धुण्यासाठी वापरले जाणारे पाणीसुध्दा स्वच्छ असावे 
 • मुक्त गोठे हा कासदाह कमी करण्याचं प्रभावी उपाय आहे.
 •  नियमित गोठे धुण्याचे टाळा . कारण ओलसर ,थंड ,दमट वातावरणात रोगजंतूंची वाढ आणि प्रसार वेगाने होतो 
 • जनावरे नेहमी कोरडया जागेत बसतील ,याची दक्षता घायची .
 • कासदाह रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण हा महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय असतो .
लसीकरणाचे फायदे :लसीकरणाचे खालीलप्रमाणे काही फायदे आहेत 
 • लसीकरणामुळे जनावरांतील संसगर्जन्य  संसर्गजन्य रोगांचा इतर जनावरांमध्ये होणारा प्रसार टाळता येतो 
 • जनावरांची खाध्य तसेच पाण्याचे प्रथिनांमध्ये तसेच शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांमध्ये रुपातंर करण्याची क्षमता वाढते.
 • संसगर्जन्य रोगांमध्ये प्राणीजन्य प्रथिनांमध्ये होणारी घट  लसीकरणामुळे  २० प्रतिशत कमी झाल्याचे दिसून येते. 
जनावरांमधील जंत (कृमी) यामुळे होणारे दुष्परिणाम व उपाय
         
         जनावरांच्या जठर व आतडयामधें विविध प्रकारचे जंत आढळतात . या जंतांची बाधा झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन जनावरांची शारीरिक वाढ व उत्पादन क्षमता कमी होते . नवजात वासरे यांना बाधा झाल्यास ती क्षीण होतात .शारीरिक वाढ खुंटते व प्रसंगी मुत्युमुखीसुद्धा पडतात.  यासाठी  जनावरांना योग्य वेळी जंतनाशक औषधी देऊन बंदोबस्त करावा.

 जनावरांमध्ये आढळणाऱ्या कृमी

 गोल कृमी  ( राऊंड वर्म ) :

           लहान वासरांमध्ये गोल कृमींचे संक्रमण जास्त आढळून येते . यात प्रामुख्याने  हिमोकस ,ॲस्कॅरिस इत्यादीचा समावेश होतो यातील हिमोकोस हा गोल कृमी जठरातील ॲबोमॅसम  या भागात आढळतो . हा कृमी रक्त शोषून घेत असल्यामुळे अत्यंत घातक आहे . गोल कृमींची अंडी कुरणातून बाधित चाऱ्याद्वारे , पाण्याद्वारे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात व अशाप्रकारे त्यांचा प्रसार होतो.

 चपटे कृमी  ( टेपवर्म  ) :


           हे कृमी चपट्या आकाराचे असतात  या कृमींची लांबी जनावरांचे पुर्ण आतडे व्यापेल म्हणजेच २ ते २० मीटरपर्यंत असते हे कृमी प्रामुख्याने आतडयांमध्ये  आढळतात व तेथील पाचक रस घटकांवर असतात यांची अंडी विष्ठेद्वारे बाहेर पडतात व गोल कृमीप्रमाणे बाधीत चारा  पाणी याद्वारे यांचा प्रसार होतो 


 पर्ण कृमी ( फ्लूक वर्म ) :
      हे जंत जनावरांचे पित्ताशय व यकृत या अवयवांमध्ये मोठया प्रमाणात आढळतात हे कमी आकाराने झाडाच्या पानांसारखे दिसतात म्हणून यांना पर्णकृमी म्हणतात या कृमींमुळे जनावरांना होण्याऱ्या रोगास फॅसिओलोसीस म्हणतात या रोगामध्ये  जनावरांच्या जबडयाखालील भागामध्ये द्रव्य साठून सुजन तयार होते व त्यांना हगवण लागून त्याचा विशिष्ट असा तिटकारा येणारा  वास येतो

 जंतनाशक औषधी देताना घायची काळज़ी

 • ही औषधी पाजताना जनावरांना ठसका ठसका लागणार नाही ,याची काळज़ी घ्यावी.
 • औषधांचीमात्रा पशुवैधकाच्या सल्याने  द्यावी.
 • कळपातील सर्व  शेळयांना एकाच दिवशी कृमिनाशक औषधी द्यावी व ती देण्याची तारीख ,मात्रा याची नोंद ठेवावी.


जनावरां मधील कासदाह जनावरां मधील कासदाह Reviewed by admin on January 25, 2019 Rating: 5
Powered by Blogger.