कृत्रिम रेतन व प्रजनन काळात पशूची काळजी

कृत्रिम रेतन


कृत्रिम रेतन म्हणजे वळूचा गायीशी प्रत्यक्ष संबंध न येऊ देता प्रजनन करणे होय . या पध्दतीत वळूपासून कृत्रिमरीत्या वीर्य मिळवून ते तसेच किंवा विरळ करून गायीच्या योनीमार्गात सोडले जाते कृत्रिम रेतन हे पशुवैधकीयच्या साहाय्याने व त्याच्या कडूनच करून घ्यावे . तसेच प्रजनन काळात पशुची योग्य काळजी घ्यावी.कृत्रिम रेतन हे जनावर माजावर आल्यावर १२ तासात करावे. कृत्रिम रेतन केल्याची नोंदवही ठेवावी. कृत्रिम रेतनामुळे ब्रुसेलोसीस, टी. बी. ट्रायकोमिनियासीस यासारख्या भविष्यात होणाऱ्या रोगांपासून जनावरांचा बचाव करू शकतो.कृत्रिम रेतन हे अयशस्वी होण्यामागे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे जनावरांचा माज ओळखण्यात होणारी चूक, अयोग्य पद्धतीने रेतमात्रेची हाताळणी आणि कृत्रिम रेतन करताना रेतमात्रा अयोग्य ठिकाणी सोडणे.कृत्रिम रेतनानंतर ४० ते ४५ व्या दिवशी गाय, म्हैस गाभण असल्याची पशुवैद्यकाकडून तपासणी करावी. जनावरांच्या आहारावर लक्ष ठेवावे. पुरेशा प्रमाणात हिरवा आणि सुका चारा द्यावा. गाभण जनावरांना योग्य प्रमाणात खाद्य मिश्रण द्यावे. 


कृत्रिम रेतन केल्यानंतर २१ दिवसांपर्यंत जनावरांवर बारकाईने लक्ष ठेवावे. जनावरांना योग्य समतोल आहार द्यावा.शेतकरी माजावर आलेले जनावर पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जातात. त्यामुळे जनावरावर ताण येतो, लगेच कृत्रिम रेतन करण्यात येते, त्यामुळे गर्भधारणेवर परिणाम होतो. त्यासाठी जनावर दवाखान्यात आणल्यानंतर १० ते २० मिनिटे विश्रांती द्यावी. जनावरांस पाणी पाजावे. जनावर शांत झाल्यावर कृत्रिम रेतन करावे.


कृत्रिम रेतनाचे फायदे 

 • प्रत्येक गोपालकास वळू ठेवण्याची गरज पडत नाही व त्याचा खर्च आणी त्रास वाचतो.
 • दूध उत्पादनाची उत्तम अनुवंशिकता असलेल्या वळूचा फायदा जास्त गोपालकास करून देता येतो .
 • कृत्रिम रेतनासाठी वापरण्यात येणारे वीर्य निरोगी असते.त्याशिवाय वळू आणी मादीचा प्रत्यक्ष संबध येत नाही त्यामुळे आनुवंशिक रोगाच्या प्रसाराला आळा बसतो.
 • बाहेरील देशातील व दूरवरच्या वळूचे वीर्य संकलीत करून त्याचा वापर कृत्रिम रेतनासाठी करता येतो.
 • कृत्रिम रेतनामध्ये गाय गाभण राहण्याची हमी जास्त असते.

कृत्रिम रेतन केव्हा करावे ?

 • कृत्रिम रेतन हे गायीच्या जागेवर करावे .
 • गायीची वाहतूक टाळावी.
 • गाय वाल्यानंतर गायीला ६० दिवसापर्यंत फळवू नये कारण तिचे गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास हा काळ महत्वाचा असतो .
 • गाय सरासरी २१ दिवसानंतर माजावर येतात व माज १२ ते १४ तास असतो  या काळात कृत्रिम रेतन करावे.जनावर रात्री माजावर आले असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी रेतन करावे, आणि सकाळी माजावर आले तर सायंकाळी रेतन करावे.
 • गाय वाल्यानंतर गायीचा वार राहिल्यास तो विकास बरा झाल्यानंतर गायीला कृत्रिम रेतन करावे.
  भारतातील वळूची माहिती :

  युवराज 


  • हरियानातील सोनारिया येथे कर्मवीर डेअरी फार्म आहे. यामध्ये सहा वर्षांचा युवराज दिमाखात उभा असतो. युवराजच्या वीर्यापासून जातिवंत मुरा म्हशींची पैदास होत असल्याने त्याला खूप मागणी आहे. त्याचे वजन तब्बल १५०० किलो आहे. उंची ५ फूट ९ इंच असून, लांबी शेपटीसह १५ फुटांची आहे. तब्बल २२ वेळा ऑल इंडिया चॅंपियन ठरलेल्या युवराजला त्यामुळेच ऑस्ट्रेलियातील काही मंडळींनी तब्बल नऊ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावून खरेदी करण्याची तयारी दाखवली होती.
  • युवराजला दररोजचा पाच किलोमीटर फेरफटका मारावा लागतो. सकाळी दहा लिटर दूध पाजले जाते. अकरा वाजता पाच किलो सफरचंद घातले जातात. सायंकाळी सहा किलो सफरचंदाचा खुराक दिला जातो. याशिवाय सहा किलो गाजरेही दिली जातात. दुधामध्ये १०० ग्रॅम काजू, बदाम, दुधात उकळून दिले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे अडीच किलो धान्य त्याला लागते. याशिवाय दहा किलो हिरवा चारा दिला जातो.
  • युवराजकडून नैसर्गिक रेतन केले जात नाही. आठवड्यातून दोन वेळा त्याचे वीर्य काढून ते कांड्यात भरले जाते. आठवड्याला सहाशे ते सातशे कांड्या वीर्याची साठवणूक केली जाते. एक कांडी ३०० रुपये याप्रमाणे विकली जाते. म्हणे एका आठवड्यात वीस ते एकवीस हजार रुपयांचे उत्पन्न युवराजकडून मिळते. 

  सुलतान 

  • सुलतान चे ठिकाण फरिदाबाद आहे .तो दररोज १०० ग्रॅम दारू  पितो. त्याला दररोज वेगवेगळ्या ब्रँड ची दारू पाजली जाते . त्याला मंगलवारी दारू पाजली जात नाही.सुलतान ला रविवारी टीचर्स,सोमवारी ब्लैक डॉग,बुधवारी १०० पाइपर ,गुरुवारी बेलेनटाइन,आणी शनिवारी ब्लेक लेबल दारू पाजली जाते.
  • सुलतान वळू चे वजन १७०० किलो आहे.हा मुऱ्हा जातीचा वळू आहे.त्याची उंची ६  फुटापेक्षा जास्त आहे.
  • सुलतान ला २१ करोड ची बोली लावलेली होती पण सुलतान च्या मालकांनी त्याला विकायला नकार दिला. सुलतान महिण्याला ३.९० लाख कमावतो.सुलतान वर्षात ३० हजार सिमेन च्या कांडया देतो . त्याची सरासरी किंमत प्रति सिमेन ३०० रुपये धरली तर त्याचे ९० लाख होतात.
  • सुलतान ला दररोज १० किलो खाद्य आणी १० लिटर दूध दिले जाते ,३५ किलो हिरवा चारा आणी सुखा चारा दिला जातो .
  कृत्रिम रेतन व प्रजनन काळात पशूची काळजी कृत्रिम रेतन व प्रजनन काळात पशूची काळजी Reviewed by admin on February 04, 2019 Rating: 5
  Powered by Blogger.