गायीची निवड ,गाभण गायीची काळज़ी


आदर्श गायीची निवड 

गायीची ठेवण-:


आकर्षक व्यक्तिमत्व,जोम शरीराचे निरनिराळे भाग एकमेकांशी सुसंबद्धपणे निगडित झालेले ,छाप पाडणारा आकर्षक चालणे याशिवाय हाडे अंगावरील स्नायु बळकट आणी रेखीव असावेत.गायीचे डोके मध्यम लांबीचे ,मजबूत व नाकपुडया मोठया व ओठ मजबूत असावेत . गायीचा जबडा मजबूत असावा या सर्व गोष्टी गायीची मजबूत अंगकाठी ,अधिक चारा चावून खाण्याच्या शक्तीचे व क्षमतेचे निदर्शक असतात . पाणीदार ,टपोरे असलेले डोळे ,उत्तम आरोग्य व दुधाळ गायींकरीता आवश्यक असण्याऱ्या मवाळ स्वभावाची लक्षणे आहेत . कपाळ काहीसे खोलगट व नाक सरळ असावे . कान मध्यम आकाराचे दर्शवणारे असावेत. मान लांब व बारीक व डोक्यास व .खांध्यास नैेसर्गिकपणे जुळलेली असावीत. घसा व पीळ रेखीव असावे.


खांदा -: 


 गायीच्या खांद्याचा भाग रेखीव ,धारदार असावा व वशिंडाशी त्याची जुळवणी ओबडधोबड नसावी. खाध्याची हाडे शरीराबाहेर आलेली दिसू नयेत गायीच्या बाजूने किंवा मागे उभे राहून हि गोष्ट् लक्षात येते.  

 पाय व खुरे-:


गायीचे पाय प्रमाणशीर असावेत व चारही पायांवर शरीराचा भार प्रमाणशीर वाढलेला असावा. पायची हाडे स्नायु मजबूत असावेत. जेणेकरून गायीला सहजपणे  हालचाल करता यावी. मागील पायाचा घोटा रुंद व रेखीव असावा. मागील पायाच्या घोटयासमोरील भाग थोडा वाकलेला असल्यास शरीराचा भाग व्यवस्थित पेलता येतो.पायाची खुरे मजबूत ,एकमेकांजवळ असावीत. पावले रुंद व मजबूत असावी. खुरांचा तळ सपाट असावा ,म्हणजे शरीराचा भार पेलणे सुलभ होते. पुढचे दोन पाय समोरून पहिले असता एकमेकांपासून दूर ,सरळ व समांतर असावेत व दोन पायांमध्ये छातीचा समोरील भाग मावण्यास भरपूर जागा असावी. 


 पाठीचा कणा-:


वशिंडाच्या मागे सुरु होऊन शेपटीच्या मुळापर्यंत पाठीच्या कण्याने तयार झालेली रेषा शक्य तितकी सरळ असावी. पाठ व कमरेचा भाग मजबुत व सरळ असावा. या भागावरील माकड टोके एकमेकांपासून दुर असावीत व पाठीच्या कण्याच्या रेषेत असावीत. माकडहाड व मांडीच्या हाडामधील सांधा माकड हाडाच्या समोरच्या व मागच्या टोकाच्या रेषेत असावा. म्हणजे गर्भाशयास भरपूर जागा मिळते. शेपटीचे मूळ रेखीव पाठीच्या कण्याच्या रेषेत असून कोणत्याही बाजूस वाकलेला नसावे.

कास-:


कासेचा मागचा अर्धा भाग मागील पायातून वरपर्यंत गेलेला काहीसा गोलाकार व समोरच्या अर्ध्या भागाशी नीट जुळलेला असावा. मागील दोन सड कासेच्या लांब रेषेत असावीत व एकमेकांपासून पुरेशा अंतरावर असावेत. कासेच्या समोरचा अर्धा भाग मागील अर्ध्या भागाशी नीट जुळलेला लांब व सरळ गोलाकार असावा. कासेचा तळ सरळ असावा व कासेच्या उजव्या व डाव्या भागाच्या मधोमध थोडासा खोलगटपणा असावा. यामुळे विण्याचे अगोदर कासेवर सूज येते. त्यावेळी गायीला त्रास होत नाही. कास शरीराशी जागोजागी घट्ट जुळलेली असावी.ही जुळवणी घट्ट असल्यास दिर्घकाळ दूध उत्पनाचा ताण पडूनही कास खाली लोंबत नाही. समोर कास फार पुढे पसरली असल्यास तिची समोरील जुळवणी लवकर ढिली होते. संपूर्ण कास मोठी व जास्त दूध मावणारी, समोर व मागे दूरवर पसरलेली.शरीराशी घट्ट जुळलेली,सपाट तळ असलेली, दोन्ही अर्धे भाग प्रमाणशीर असलेली असावी . हाताला कास मऊ लागावी. कासेचे चारही सड एकमेकांपासून दूर चार भागांच्या खाली असावेत. सडांचा आकार मध्यम असावा.


गाभण गायीची काळज़ी-:


जनावरांच्या गाभण काळात गर्भाची वाढ हळू हळू होते आणी नंतरच्या तीन महिण्यात गर्भाची वाढ झपाटयाने होते म्हणजे सहा महिण्याच्या  वाढीपेक्षा तीन पट होते  यात गर्भाचे पोषण करण्यासाठी आवश्यक असलेले अन्नघटक, खनिजे व जीवनसत्त्व यांचा उपयोग स्वतःच्या  आणी गर्भाच्या पोषणासाठी करता येतो. कासेस आराम मिळाल्याने कासेची अंतर्गत क्रिया व्यवस्तिथ होण्याकरिता भरपूर वेळ मिळतो. त्याचा फायदा पुढील वेतात जास्त उत्पादनाच्या दुर्ष्टीने होतो. भाकड करताना शेवटचे दूध काडल्यानंतर  डॉक्टरणांच्या सल्ल्याने सडात प्रतिबंध  मलम सोडा.

मुरघास  (murghas),
गायीची निवड ,गाभण गायीची काळज़ी गायीची निवड ,गाभण गायीची काळज़ी Reviewed by admin on January 30, 2019 Rating: 5
Powered by Blogger.