भेंडी ( bhendi )

भेंडी-: भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे. भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते भेंडीच्या भाजीला वर्षभर भरपूर मागणी असते. .अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो.भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे पाणी - ९०%, प्रोटीन्स -१.९ %,कार्बोहायड्रेट्स - ६.४% कॅल्शियम - ०.०७%, लोह -०.००२%, इत्यादी .

वाण -: फुले कीर्ती,फुले उत्कर्षा,पुसा सावनी, महाबीज ९१३ (तर्जनी), परभणी क्रांती,अर्का अनामिका 
पेरणी वेळ -: खरीप - जुलैचा पहिला आठवडा , उन्हाळी - जानेवारीचा तिसरा आठवडा 
बियाण्याचे प्रमाण -: १३ ते १५ किलो प्रति हेक्टर. 
लागवडीचे अंतर -: ३० x १५ सें. मी. 
खतांची मात्रा -: हेक्टरी २५ते ३० टन शेणखत , १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद  आणी ५० किलो पालाश द्यावे.
हवामान आणी जमीन  -: भेंडीच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. या पिकाच्या पेरणीची वेळ ही तापमानावर अवलंबून असते. तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर बियांची उगवण चांगली होत नाही. तसेच तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास फुलांची गळ होते. . तर दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
                                  मध्यम काळ्या किंवा पोयट्याच्या जमिनीत भेंडीची वाढ चांगली होते. हलक्या जमिनीमध्ये पिकाची वाढ जोमदार होते नसल्याने उत्पादन व दर्जामध्ये विपरीत परिणाम जाणवतो. त्यासाठी अशा जमिनीत जास्तीत - जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. जमिनीचा सामू ६ ते ७ च्या दरम्यान असावा. 
पाणी -: हंगामानुसार ५ ते ६ दिवसांच्या अंतराने भेंडीला पाणी द्यावे.
सेंद्रिय खते -: २० टन शेणखत किंवा ७ ते ८ टन गांडूळ खत प्रति हेक्टर दयावे. सेंद्रिय खत पेरणीपूर्वी १५ दिवस अगोदर दयावे .
जिवाणू खते -: ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
आंतरमशागत -: १५-२० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करावी.
उत्पादन -: १५-२० टन  प्रति हेक्टर .
फायदे-: 

  • हाडे मजबूत होतात. 
  • वजन घटण्यास मदत होते. 
  • मेंदूचे कार्य सुधारते. 
  • गरोदर स्त्रियांसाठी उत्तम. 
  • पोटफुगी, बद्धकोष्ट, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.

भेंडी ( bhendi ) भेंडी ( bhendi ) Reviewed by admin on February 09, 2019 Rating: 5
Powered by Blogger.