बटाटा (btata)

बटाटा लागवड (btata lagwad)

btata lagwad


जमीन -: मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमीन कसदार भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा.

भरखते -: ३०-४० टन  शेणखत प्रति हेक्टर

सुधारित जाती -: कुफरी चंद्रमुखी ,कुफरी जोती ,कुपरी शिंदुरी,पृखराज,कुफरी अलंकार,कुफरी बादशाह


कुफरी चंद्रमुखी -: मध्यम उंचीचे व जोमदार वाढणारे, कालावधी ९० ते ११० दिवस , एकरी ८० ते ९० क्विंटल उत्पादन.
कुपरी शिंदुरी -: उंच व उभे वाढते. कालावधी ११० ते १२० दिवस . एकरी ९० ते १०० क्विंटल उत्पादन.
कुफरी जोती -: कालावधी १०० ते १३० दिवस . एकरी ८० ते १०० क्विंटल उत्पादन.
कुफरी अलंकार -: कालावधी ७० ते ८० दिवस .एकरी ८० ते १०० क्विंटल उत्पादन.
कुफरी बादशाह -: कालावधी १०० ते १३० दिवस .एकरी ९० ते ११० क्विंटल उत्पादन.

पेरणीची वेळ -: खरीप - जुन - जुलै , रब्बी - ऑक्टोबर - नोव्हेंबर

लागवडीचे अंतर -: सऱ्या-वरंबे , ४५ x ३० सें. मी.

बियाण्याचे प्रमाण -: ८०० ते १५०० किलो / हेक्टरी.

बीजप्रक्रिया -:   १.लागवडीसाठी बटाटयाची फोडी करते वेळी कोयता कॉपर ऑक्झीक्लोराईड
                         (०. ३%) या औषधाच्या द्रावणात बुडवून घ्यावा.
                       
                          २.लागवडीपूर्वी कॅप्टन ३० ग्रॅम +कार्बेन्डॅझिम १० ग्रॅम लिटर पाण्यात मिसळून                                       तयार केलेल्या द्रावणात बुडवून लागवड करावी .

रासायनिक खते -: लागवडीपूर्वी १०० किलो नत्र ,६० किलो स्फुरद ,१२० किलो पालाश प्रति हेक्टरी . आणि लागवडीनंतर एक महिण्याने ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा ध्यावी. बटाटा (btata) बटाटा (btata) Reviewed by admin on February 19, 2019 Rating: 5
Powered by Blogger.