कोबी ( kobi )
सुधारित वाण -: गोल्डन एकर , सिलेक्शन-८,कल्याणी सिलेक्शन -१
जमीन -: रेताड ते मध्यम काळी निच-याची जमीन या पिकास लागवडीस योग्य आहे. जमिनीचा सामु 5.5 ते 6.6 च्या दरम्यान असावा.
हवामान -: या पिकांना हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक असते. फूलकोबीच्या जाती तापमानाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यांची निवड त्या त्या हवामानाच्या गरजेनुसार करावी.
पेरणी पूर्वी -: पेरणीपुर्वी बी गरम पाण्यात 50 अंश सेल्सिअस तापमानास अर्धा तास किंवा स्ट्रेप्टोसायक्लीन च्या 100 पीपीएम द्रावणात 2 तास बुडवावे. व नंतर बी सावलीत सुकवावे.
पेरणीची वेळ -: रब्बी -सप्टेंबर -ऑक्टोबर
पुनर्लागवडीची वेळ -: रब्बी -ऑक्टोबर - नोव्हेंबर
बियाण्याचे प्रमाण -: ६०० ते ८०० ग्रॅम /हेक्टर
लागवडीचे अंतर -: ४५ x ३० सें . मी.
खतांची मात्रा - : २२ टन शेणखत १६० किलो नत्र ,८० किलो स्फुरद ,८० किलो पालाश प्रति हेक्टर ५० टक्के नत्र ,संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी व उर्वरीत ५० टक्के लागवडीनंतर १ महिण्याने दयावे .
आंतरमशागत -: १५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करावी .
पाणी व्यवस्थापन -: ८ ते १० दिवसाच्या अंतराने व गरजेनुसार पिकाला पाणी देणे.
पिकाचा कालावधी -: जातीपरत्त्वे ६५ ते ८० दिवस . तयार गडडा हातास टणक लागतो. तयार गडडा जादा काळ तसाच ठेवला तर पाणी दिल्यावर तो फूटून नुकसान होण्याचा संभव असतो. म्हणून तो वेळीच काढून घ्यावा. फूलकोबी चा गडडा पिवळसर पडण्यापूर्वी काढावा.
उत्पादन -: कोबीचे 200 ते 250 क्विंटल हेक्टरी उत्पादन घेता येते.
किड व रोग -:
कोबीवर्गीय भाज्यांना मावा तुडतुडे फूलकिडे कोबीवरील अळी कॅबेज बटर फलाय असे विविध किडींचा तसेच ब्लॅक लेग, क्लब रूट, घाण्या रोग, रोपे कोलमडणे, लिफ स्पॉट या रोगांचा प्रादुर्भाव होतो.किडींच्या बदोबस्तासाठी रोपवाटीकेतीील रोपांपासून ते लागण झालेल्या भाज्यांवर एन्डोसल्फान 35 सीसी 290 मिली किंवा फॉस्फोमिडॉन 85 डब्ल्यू एस सी 60 मिली किंवा मॅलेथिऑन 50 सीसी 250 मिली 250 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. किडी व रोगाचे एकत्रितरित्या नियंत्रण करण्यासाठी मॅलॅथिऑन 50 सीसी 500 मिली अधिक कॉपर ऑक्झक्लोराईड 50 डब्ल्यूपी 1050 ग्रॅम् किंवा डायथेम एम 45, 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. वरील किटक नाशकांच्या 2 ते 3 फवारण्या 10 ते 12 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
कोबी ( kobi )
Reviewed by admin
on
February 13, 2019
Rating:
