मुरघास (murghas)

मुरघास (murghas) -:सर्वसाधारणपणे आपल्याकडे फक्त पावसाळ्यात ३-४ महिने हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु वर्षातील उरलेल्या ८-९ महिने हिरव्या चारा कमी पडतो. या अडचणीवर मात करण्याचा मुरघास रामबाण उपाय आहे. मका, ज्वारी इत्यादी एकदल पिकांच्या हिरव्या चाऱ्यापासून मुरघास करता येतो.


मुरघास तयार करण्याची पद्धत -:
     
        कुटीयंत्राच्या साहाय्याने चाऱ्याची कुटी करून ती खड्यामध्ये भरावी. मक्याचे पीक पोटरीवर येऊन दाणे दुधाळ असताना  कापावे .ज्वारी किंवा बाजरीचे पीक फुलोऱ्यावर(संकरित नेपिअर गवत )  असताना मुरघास करावा. खड्डा भरत असताना वरून सतत दाब द्यावा त्यामुळे खड्डयांत हवा भरणार नाही . हवा राहिल्यास चारा कुजण्याचा संभव असतो  चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करण्याकरिता द्विदल पिकांमध्यें बारीक तुकडयावर १ ते १.५ टक्के गुळाचे पाणी ,तसेच एकदल पिकामध्ये एक टक्का युरिया पाण्यात मिसळून फवारावा . खड्डा पूर्ण भरल्यानंतर खड्डयाच्या पृष्ठभागावर ३ ते ४ फूट उंच वैरणीचा निमुळता ढीग करावा आणि त्यावर कडब्याच्या पेंढयाचा थर पसरावा. त्यानतंर शेण व चिखल यांच्या मिश्रनाचा थर देऊन खड्डा झाकून टाकावा. खड्डयावर पॉलीथिन पेपरसुद्धा अंथरण्यास हरकत नाही. मुरघास बॅगमध्ये मुरघास करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या (५० किलोपासून १००० किलोपर्यंत) बॅग बाजारात उपलब्ध असतात. मुरघास खराब होऊ नये म्हणून बॅगमध्ये प्लॅस्टिकचे आवरण दिलेले असते.
                  मुरघास तयार होण्यास ५५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर खड्डयाच्या किंवा पाईपच्या तोंडास थोडेसे भोक पाडून त्यातून रोज मुरघास काढुन घेतल्यानतंर त्यावर वाळलेले गवत घालून तोंड बंद करावे . दुभत्या जनावरास दररोज १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालावा . वासरांना मुरघास घालू नये . मुरघास आंबट गोड चारा असतो. त्यामुळे जनावरे आवडीने खातात.खड्ड्याचे पावसाचे पाणी व उन्हापासून संरक्षण करण्याची व्यवस्था करावी.
     ( टीप - जर तुम्ही पहिल्यांदाच मुरघास बनविणार असाल तर मीठ, युरिया वगैरे काहीही त्यात टाकू नये.)

मुरघास तयार करण्याचे प्रमाण-:

  • मुरघास तयार करण्याचे प्रमाण हे किती जनावरांना किती किलो घालणार आहे,साठवण करण्यास उपलब्ध, यांच्यावर अवलंबून असते.समजा आपण ४ गाई आणी ६० दिवसाचा चारा टंचाईचा काळ धरला आणी एका गाईला १५ किलो मुरघास दिवसाला . ४ x ६० x १५ = ३६०० किलो मुरघास होतो . 

पिकांची कापणी-:

मका, ज्वारी - ५० टक्के फुलोऱ्यात ते चिकात असताना.
संकरित नेपिअर गवत (हत्ती गवत) - कापणीनंतर ३० ते ४० दिवस वाढलेले.

  • मुरघास बनवताना चारा पिकांमध्ये ६५-७० टक्के पाणी आणि ३०-३५ टक्के शुष्क भाग असणे आवश्यक असते.
  • मुरघासासाठी आवश्यक ६५-७० टक्के पाण्याचे प्रमाण आणण्यासाठी कापलेला चारा ४ ते ५ तास जागेवर सुकू द्यावा.
 


मुरघास (murghas) मुरघास (murghas) Reviewed by admin on February 05, 2019 Rating: 5
Powered by Blogger.