वाटाणा (vatana)

वाटाणा लागवड  पिकाची माहिती

वाटाणा पिकाची माहिती,वाटाणा लागवड


वाटाणा ही एक अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी भाजी आहे. वाटाणा हे थंड हवामानातील पीक आहे आणी त्याची  लागवड , रशिया, चीन , उत्तर अमेरिकेत, युरोप इत्यादी देशातकेली जाते.
भारतात वाटाण्याची लागवड प्राचीन काळापासून होत आहे. रब्बी हंगामात उत्तर व पश्चीम महाराष्ट्रात वाटाणा हे एक महत्वाचे पिक आहे. जमीन -: मध्यम ते भारी निचऱ्याची
भरखते -: १६ ते २२ टन शेणखत प्रति हेक्टर
सुधारित जाती -: बोनव्हिला ,आरकेल ,फुले प्रिया , जवाहर - १


आरकेल -: आरकेल या वाटाणा जातीच्या शेंगाचा रंग गर्द हिरवा असतो. आणी ५ ते ७ से. मी. लांबी असते . झाडांची उंची ३४ ते ४५ सेंमी. ५० ते ६० दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.


बोनव्हिला -: बोनव्हिला या वाटाणा जातीच्या शेंगाचा रंग गर्द हिरवा रंग असतो. शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात. झाडांची उंची मध्यम असून ४० ते ४५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.


जवाहर - १ -: जवाहर - १ या वाटाणा जातीच्या शेंगाचा रंग फिकट हिरवा रंग असतो . सर्वसाधारणपणे ६ सेंमी. पर्यंत. लांब असतात. लागवडीपासून ५५ दिवसांत फुलावर येते व ९० दिवसांत शेंगा काढणीस सुरवात होते.

पेरणीची वेळ -: रबी -ऑक्टोबर -नोव्हेंबर 

लागवडीचे अंतर -: सऱ्या -वरंबे किंवा सपाट वाफे, ३० ते १५ से. मी. 

बियाण्याचे प्रमाण -: एकरी २० ते २५ किलो.  

बीजप्रक्रिया -: कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे .

रासायनिक खते -: १५:६०:६० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी , लागवडीनंतर एक महिण्याने १० किलो नत्र प्रति हेक्टर खताची मात्रा दयावी .

पिकाचा कालावधी -: जाती नुसार ८० ते १०० दिवस

उत्पादन -: जातीनुसार हिरव्या शेंगा - ४ ते ७ टन  हेक्टरी आणि १.५ ते २ टन प्रति हेक्टरी.

पीक संरक्षण -: 


  • मर रोग -: पेरणीपूर्वी बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर किंवा कॅप्टन ३ ते ४ ग्रॅम प्रति  किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर ५-६ किलो ट्रायकोडर्मा  पावडर शेणखतात मिसळून जमिनीत मिसळावे .   
  •  भुरी -: पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . 
  • मावा -: पिले व प्रौढ पानातील रस शोषतात त्यामुळे पिकाचे नुकसान होते . डायमेथोएट १० मिली १० लिटर . पाण्यातून फवारावे. 
  • शेंगा पोखरणारी अळी -: १) कीडग्रस्त शेंगा नष्ट करावे . २) डेल्टामेथ्रीन ५ मिली १० ली . पाण्यातून फवारावे .
वाटाणा (vatana) वाटाणा (vatana) Reviewed by admin on March 01, 2019 Rating: 5
Powered by Blogger.